सोलापुरातील लॉकडाऊनला आडम मास्तरांचा विरोध,रस्यावर उतरण्याचा दिला इशारा

solapur

सोलापूर : योग्य नियोजन नसल्याने सोलापुरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण हे सोलापूर शहरात आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही साखळी तोडण्यासाठी शहरात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आला आहे. 16 जुलैच्या मध्यरात्रीपासून 26 जूलैपर्यंत लॉकडाऊन लागू असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

मात्र आता याच मुद्द्यावरून राजकारण सुरु झालं आहे. लॉकडाऊन करुन श्रमिकांना बेरोजगार करणाचे हे षडयंत्र असल्याचा आरोप ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम यांनी केला. सोलापुरात रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीयेत. सामान्य जनतेला सोबत घेऊन करण्याचे कोणतेही नियोजन नाहीये. असे असताना लॉकडाऊन शिवाय कोणताच पर्याय नाही, अशा प्रकारच्या वल्गना प्रशासकीय अधिकारी करत असल्याची टीका कॉम्रेड नरसय्या आडम यांनी केली.जर लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही तर सोलापुरातील श्रमिक कामगार रस्त्यावर उतरतील, असा इशारा देखील नरसय्या आडम यांनी दिला.

दरम्यान, पुण्यात देखील या मुद्द्यावरून राजकारण सुरु झालं आहे. पुणे व्यापारी संघानंतर पुण्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे.

‘मास्क लावला नाही, शरीररिक अंतर पाळले नाहीतर कडक कारवाई करा, पण 3 टक्के प्रतिबंधीत क्षेत्रातील लोकांसाठी 97 टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? आम्ही सहकार्य करू पण लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. केवळ अधिकाऱ्यांवर विसंबून लॉकडाऊन सारखा सोपा निर्णय घेऊ नका,’ अशा शब्दात पुण्याचे खासदार आणि माजी पालकमंत्री भाजप नेते गिरीश बापट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.news 18 लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘पुढून, मागून कसंही पाहिलं तरी गडी पैलवान काय वाटतं नाही’

परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ, आता तरी HRD आणि युजीसीला पटेल का?

सरकारने नाही तर RSS च्या स्वयंसेवकांनी धारावीत जीव धोक्यात घातला होता – चंद्रकांत पाटील

‘फडणवीस फिल्डवर काम करत असल्याने जनता कौतुक करित आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंना पोटशूळ उठले’