fbpx

सदाभाऊंच्या रयत क्रांतीला विधानसभेत हव्यात १० जागा

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर रयत क्रांती संघटनेने देखील आपल्या समविचारी भाजप पक्षाबरोबर युती केली आहे. त्यामुळे आता येत्या विधानसभा निवणुकीत युतीमध्ये कसे जागांचे वाटप केले जाणार यावर सर्वांचे लक्ष लागेले आहे. तर सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडे १० जागांची मागणी केली आहे. त्यामुळे युतीची डोकेदुखी वाढणार असल्याच दिसत आहे.

याबाबत खोत म्हणाले की, रयत क्रांती संघटनेची अनेक ठिकाणी पायामुळं घट्ट आहेत. त्यामुळे १० जागांची मागणी ही रास्त आहे. इस्लामपूर, शाहूवाडी पन्हाळा, कराड उत्तर, माण, कोरेगाव, फलटण, नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघ, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ नाशिकमशील सटाणा आणि विदर्भमधील चिखली अशा १० मतदारसंघावर सदाभाऊ खोत यांनी दावा केला आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजप – सेना १३५ जागा लढवणार असल्याचा दावा भाजपाने केला आहे. तर १८ जागा मित्रपक्षांना देण्याचे भाजपाने याआधीच जाहीर केलं आहे. भाजपबरोबर सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, आठवले यांचा आरपीआय, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम हे मित्र पक्ष आहेत.