न्यायालयाने दिलेले मराठा आरक्षण घटनाबाह्य, लवकरचं सुप्रीम कोर्टात जाणार – अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयावर अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेत आरक्षणाला विरोध केला आहे. उच्च न्यायालयाने दिलेले मराठा आरक्षण घटनाबाह्य आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेविरोधी आहे. मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टाच्या निकाल हा न्यायालयीन प्रक्रियेचा भंग करणारा आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे, असे अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हंटले.

काय आहे प्रकरण?

राज्यात शैक्षणिक क्षेत्रात व सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधी ३० नोव्हेंबर, २०१८ मध्ये राज्य सरकारने कायदा मंजूर केला होता. या कायद्याला विरोध करणाऱ्या तर काही सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. आज (गुरुवार) या याचिकांवर उच्च न्यायालयाने निकाल दिला.

राज्य सरकारला १०२ च्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षण देण्याचा अधिकार आहे. आयोग नुसार मराठा समाज मागास आहे. अपवादात्मक स्थितीत ५० टक्के आरक्षणात बदल शक्य असल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला शिक्षणात १२ तर नौकरीत १३ टक्के आरक्षणाला मान्यता दिली.

IMP