मुंबई : पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) आंतरराष्ट्रीय क्रिकेट (cricket) सोडलं असलं तरी तो सतत चर्चेत असतो. शाहिद आफ्रिदीचे चाहते पाकिस्तान आणि इतर देशांमध्ये देखील आहेत. नुकतच विमानातून प्रवास करताना त्याला अभिनेत्री पाकिस्तानी अभिनेत्री उषाना शाह (Pakistan’s actress Ushana Shah) भेटली. ती देखील त्याची फॅन झाली असून विमानामधील भेटीबद्दल सांगितले आहे.
पाकिस्तानी (Pakistan) अभिनेत्री उषाना शाहने ट्विट करून माहिती दिली होती की, फ्लाईट दरम्यान शाहिद आफ्रिदीशी भेट झाली होती. याबद्दल टि्वटमध्ये तिने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिदी आफ्रिदीला भेटले तो खूप विनम्र आहे असे लिहिले आहे, शाहिद आफ्रिदीने मला आशिर्वाद दिला व प्रोत्साहित केले. लाला ने माझं मन जिंकलं, असही तिने शेवटी लिहिलं आहे. शाहिद आफ्रिदीला पाकिस्तानात लाला म्हणतात. उशना शाह पाकिस्तानी टीव्ही अभिनेत्री आहे. पाकिस्तानातील फेमस टीवी शो परिजादमध्ये ती काम करत आहे. परिजाद शिवाय उशना शाह बशर मोमिन, दुआ, अब कर मेरी रफूगिरी, थोडा सा आसमानसह वेगवेगळ्या पाकिस्तानी सीरियलमध्ये काम केले आहे.
On a flight with @SAfridiOfficial bhai. Hands down the biggest star in Pakistan yet so humble. Blessed me with encouragement & duas & SO gracious & kind to everyone who would come up to him, especially children.
Lala ney dil jeet liya 🇵🇰 👍— Ushna Shah (@ushnashah) January 11, 2022
अभिनेत्री उशना शाह सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखों फॉलोअर्स आहेत. अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती बेलारुसला गेली होती.शाहिद आफ्रिदी पाकिस्तानच्या मोठ्य़ा क्रिकेटपटूंपैकी एक आहे. पाकिस्तानसह अन्य देशातही शाहिदचा चाहतावर्ग आहे. उशना शाह आणि शाहिद आफ्रिदीच्या या भेटीची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु असून सोशल मीडियावर लाईक कमेंट केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
औरंगाबादेत अॅण्टिजेन, आरटीपीसीआर तपासणी न करणाऱ्या १५ खासगी प्रयोग शाळांना नोटिसा!
-
पंतप्रधानांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “प्रत्येकाने…”
- “नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही…”, फडणवीसांची शरद पवारांवर टीका
- “…म्हणजे सांस्कृतिक दहशतवादाला बळी पडल्याचे लक्षण”,किरण मानेंच्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंची टीका
- नाशिकच्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण; हायव्होल्टेज तारेचा धक्का लागल्याने तीन जवानांचा मृत्यू
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<