fbpx

अखेर ‘कॉंग्रेस’च्या हाताला मिळाली ‘उर्मिला’ची साथ

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने अखेर काँग्रेसशी हाती मिळवणी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन उर्मिलाने पक्षप्रवेश केला. उर्मिला काँग्रेसतर्फे मुंबईतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

लहानपणापासूनच महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांनी प्रभावित असल्याचं उर्मिलाने यावेळी सांगितलं. काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास असल्यामुळे आपण पक्षप्रवेश केल्याचंही तिने सांगितलं.

यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष अभिनेत्यांच्या प्रसिद्धीचे परिवर्तन मतांमध्ये करून घेणार आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देवून भाजपचे गोपाळ शेट्टी यांना तगडे आव्हान उभे करणार आहे.

उत्तर मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी हे धडाडीचे उमेदवार असल्याने त्यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न कॉंग्रेसला पडला होता. पण आता उर्मिलाला उमेदवारी देण्याचा विचार काँग्रेस करत आहे. याआधी काँग्रेसकडून याठिकाणी आसावरी जोशी, शिल्पा शिंदे यांचीही नावं देखील चर्चेत होते. पण अखेर उर्मिला मातोंडकर यांनी बाजी मारल्याच दिसत आहे.

 

 

1 Comment

Click here to post a comment