पारंपरिक साडी नेसलेल्या फोटोने अभिनेत्री ऋतुजा वेधत आहे सर्वांचे लक्ष

rutuja

मुंबई : नवरात्रनिमित्त चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री देखील हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत. अनेक अभिनेत्रींनी पारंपरिक वस्त्र परिधान करून फोटो शेअर केले आहेत. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने देखील निळ्या रंगाची साडी नेसून सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

ऋतुजाने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने फिकट निळ्या रंगाची एक सुंदर साडी नेसलीले दिसत आहे. यावर तिने सोनेरी रंगाची ज्वेलरी परिधान केली आहे. ती या साडीसोबत वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तसेच कपाळी निळ्या रंगाची टिकली लावली आहे. फोटोमध्ये ती नेहमी प्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत. ‘तू आणि तुझं हसणं आणि तुझं सुंदर दिसणं. मी आणि माझं तुला पाहणं. हाय ऋतुजा लग्न करशील का माझ्याशी?’ , ‘किती ते नखरे.., ‘रूप देखणे बघून नयन हे सुखावले’ यासारखे बरेच कमेंट येत आहेत. ऋतुजा बागवे ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक मालिका तसेच चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

छोटयापडद्यावरील ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘मंगळसूत्र’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘तू माझा सांगाती’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तिने केलेल्या पात्रांमध्ये संस्कारी मुलीचे पात्रं प्रेक्षकांना खूपच आवडला होता. याप्रमाणे ऋतुजा ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटात देखील काम केले असून सध्या ती सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या