मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा सिनेमागृहात विनयभंग

अभिनेत्री देखील असुरक्षित

मुंबई – मराठी अभिनेत्री व दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांचा विनयभंग झाल्याचे माहिती समोर आले आहे. मीरारोड येथील सिनेमा गृहामधली ही घटना आहे. शनिवारी (15 जुलै) ही घटना घडली आहे.
प्रिया बेर्डे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी व त्याचे दोन मित्र मद्यधुंद अवस्थेत थिएटरमध्ये आले होते. शो सुरू झाल्यानंतर या तिघांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी अन्य प्रेक्षकांनीही त्या तिघांना हटकलं व शांत बसण्यास सांगितले. काही वेळानं त्यातील एकानं स्पर्श केल्याचं जाणवल्यानं प्रिया बेर्डे यांनी त्याच्या थोबाडीत लगावली व आरोडाओरडा केला.  घडल्या प्रकाराला न घाबरता न गप्प बसता प्रिया यांनी त्याविरोधात आवाज उठवला. छेडछाड करण्याला चोप देऊन त्याला अद्दल घडवली.
यानंतर त्या विकृतानं तेथून पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रिया यांनी त्याचा पाठलाग केला. सुरक्षा रक्षकांच्या मदतीनं त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले
You might also like
Comments
Loading...