कोरोनामुक्त झाल्यानंतर अभिनेत्री प्रिया बापटची पहिली पोस्ट, म्हणाली…

प्रिया बापट

मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्य आणि देशात कोरोनाच्या रुग्णाचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या या लाटेने हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकाराना आपल्या जाळ्यात ओढले आहे. मागील काही दिवसापासून बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ अनेक कलाकाराना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मराठी सिनेसृष्टीतलं क्यूट कपल उमेश कामंत आणि प्रिया बापट यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली होती. याबद्दल दोघांनीही सोशल मीडियाद्वारे हि माहिती दिली होती. यावेळी दिघेही स्वत:च्याच घरात क्वारंटाईन होते. मात्र, या दोघांच्या चहत्त्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.  कोरोनावर मात करून दोघेही  कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत.

नुकतंच प्रिया बापटने इंस्टग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियाच्या हातात एक कप असून, ती ऐरणीच्या देवा… हे मराठी गाणं म्हणताना दिसतं आहे. कोरोना काळात तिला हे गाणं सुचलं असल्यानं तिनी हे गाणं म्हणत व्हिडीओ शूट करून, तो शेअर केला आहे. त्याचबरोबर व्हिडीओ पोस्ट करताना प्रियाने ‘गो कोरोना गो’ असं कॅप्शनही दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या :