प्राजक्ता गायकवाडने केली ‘लॉकडाउन लग्न’ची सुरवात…

प्राजक्ता गायकवाड

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने झी मराठीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत येसूबाईंचे पात्रं उत्तमरित्या साकारले होते. तिची ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली आणि या मालिकेतील भूमिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर आता ती रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. नुकतेच तिने याबाबत सोशल मीडियावर तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन सांगितले आहे.

प्राजक्ता गायकवाड ‘लॉकडाउन लग्न’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करते आहे. या चित्रपटाचा अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पोस्टर लाँच करण्यात आला. याबाबत तिने इंस्टाग्रामवर सांगितले आहे. तिने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, गणपती बाप्पा मोरया..१४ मे रोजी अक्षय तृतीया, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त….छत्रपती संभाजी महाराज जयंती… याच शुभमुहूर्तावर माझ्या नवीन प्रोजेक्टची सुरुवात.. तसेच पुढे तिने फोटो शेअर करत लिहिले की, नवीन प्रोजेक्ट, नवीन चित्रपट ‘लॉकडाउन लग्न’ नवीन सुरूवात.

‘लॉकडाउन लग्न’ या चित्रपटाच्या शूटिंग लवकरच लंडनमध्ये सुरू होणार असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमीत संघमित्रा करणार आहे. तर या चित्रपटाची निर्मिती किरण कुमावत, स्वाती खोपकर, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे आणि सागर पाठक करत आहेत. तर निनाद बत्तीन व तरबेज पटेल सहनिर्मिती करत आहेत. सोशल मिडियावर तिच्या या नवीन प्रोजेक्टसाठी अनेकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP