हृतिक रोशनच्या ‘काबिल’ सिनेमातील अभिनेत्री करतेय मराठीत पदार्पण

मुंबई : काबिल सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री नीलम पांचाल आता लवकरच मराठीत पदार्पण करतेय. नुकत्याच झालेल्या 66व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आपला गुजराती चित्रपट ‘हिलारो’मधल्या अभिनयासाठी नीलमला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

इश्कबाज, वीरा, रूक जाना नहीं, हमारी देवरानी ह्या हिंदी मालिकेत काम केलेल्या नीलम पांचालने हृतिक रोशनच्या काबिल सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. सध्या हिंदी नाट्यसृष्टीत गाजणा-या भारत भाग्यविधाता ह्या हिंदी नाटकात ‘कस्तुरबा’ ह्यांची भूमिका नीलम साकारत आहे. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात रजत कमल पुरस्काराने सन्मानित झालेल्या नीलम पांचालने नुकताच आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीयो टाकला आहे. ह्या व्हिडीयोत ती मराठीचे धडे गिरवताना दिसत आहे. त्यामूळे तिच्या मराठी पदार्पणाविषयीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading...

अभिनेत्री नीलम पांचालला ह्याविषयी विचारले असता ती म्हणाली, “हो मी सध्या माझ्या मराठीसृष्टीतल्या पदार्पणाची तयारी करत आहे. मी मुंबईत राहत असल्याने आणि मराठी सिनेमांची चाहती असल्याने मराठी मला समजते. पण मला बोलता येत नाही. पण आता मराठीत पदार्पण करत असल्याने मराठीचे धडे गिरवणे सध्या सुरू आहे.”

आता हा मराठी सिनेमा आहे की वेबसीरीज, नाटक आहे की मालिका, ह्याविषयी मात्र नीलमने काही सांगण्यास सध्या नकार दिला आहे. नीलम म्हणते, “सध्या प्रोजेक्टवर काम सुरू आहे. मराठीतल्या एका नामवंत दिग्दर्शकाच्या प्रोजेक्टमध्ये मी काम करत आहे. आणि निर्मात्यांकडून अनाउन्समेन्ट न झाल्याने मी ह्याविषयी जास्त रिविल करू शकत नाही.”

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन