‘मी महाराष्ट्राची मुलगी, घाबरणार नाही, गप्प बसणार नाही’

मुंबई : मराठी अभिनेत्री मानसी नाईक ५ फेब्रुवारीला पुण्यातील शिरुर तालुक्यात रांजणगाव येथे सायंकाळी वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमासाठी गेली होती. पुण्याचा युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात कला सादर करत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी गैरकृत्य केलं. त्याने मंचाजवळ जाऊन मानसीला धमकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मानसीकडून करण्यात आला आहे.

याप्रकरणी मानसी नाईकने मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. साकीनाका पोलिसांनी तपासासाठी हे प्रकरण रांजणगाव पोलिसांकडे वर्ग केलं आहे. याशिवाय याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते आहे. याबाबत मानसीने मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, त्यानंतर तिने आपली प्रतिक्रिया दिली. ‘हे प्रकरण माझ्यापर्यंत होते तोपर्यंत मी काहीही बोलले नाही. मात्र, माझ्या आईला धमकविण्याचा प्रयत्न झाला आहे. आज महिलांबाबत अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे महिलांनी पुढे आले पाहिजे. मी महाराष्ट्राची मुलगी आहे. मी घाबरणार नाही, मी गप्प बसणार नाही, असे तिने तक्रार दाखल केल्यानंतर स्पष्ट केले.