लॉक डाऊन मध्ये ‘हे’ अवघड काम करतेय अभिनेत्री मलायका अरोरा!!

मुंबई : कोरोना मुळे संपूर्ण देशात २१ दिवस लॉक डाऊन आहे. संचारबंदी, जमावबंदी असल्यामुळेच सामान्यांसोबतच बॉलिवूड स्टार्स देखील घरात आहेत. विविध बॉलिवूडकर त्यांचा फॅमिली क्वालिटी टाईम घालवताना दिसत आहेत.

फिटनेस फ्रिक म्हणून अगदी तरुणींना लाजवेल अशी असणारी मलायका अरोरा हि सद्या घरीच असून तिची खास आवड जोपासताना दिसत आहे. मलायका ने इंस्टाग्राम वर काही व्हिडिओ शेअर केले असून ते प्रचंड व्हायरल होत आहेत. बेसनाचे लाडू बनवतानाच्या व्हिडिओ मध्ये ती अगदी चांगल्या गृहिणी प्रमाणे लाडू करत असल्याचे दिसून येते.

या व्हिडिओ मधून तिने जेवण बनवण्याची खास आवड असल्याचे सांगितले. दरम्यान, या लॉक डाऊन मुळे मोठ्या व्यक्ती हे स्वतः ची आवड, छंद जोपासताना दिसत आहेत. मलायका ने सर्व चाहत्यांना घरी सुरक्षित राहण्याचे आवाहन देखील केले आहे.

काही वर्षांपूर्वी मलायका व अरबाज यांचा घटस्फोट झाला होता. सध्या अर्जुन कपूर आणि तिच्या नात्याच्या चर्चा ह्या अधून मधून त्यांच्या एकत्र फिरण्यामुळे वारंवार ट्रेंडिंग ला येत असतात.