अभिनेत्री महिमाचा,अजय देवगणसोबत जोडलं जायचं नाव, महिमाने केला खुलासा ; आज ४८वा वाढदिवस करतेय साजरा

mahima

मुंबई : बॉलीवूडमध्ये ‘परदेस’ या चित्रपटाच्या माध्यमाने अभिनेत्री महिमा चौधरी पदार्पन केले होते. पहिलाच चित्रपट दिग्गज अभिनेता शाहरूख खान सोबत होता. यामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली होती.

महिमा चौधरी आज ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र महिमा प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ यामुळे सतत चर्चेत असायची. दार्जिंलिंगमध्ये तिचा १३ सप्टेंबर १९७३मध्ये जन्म झाला. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्यातील एक किस्सा असा आहे की, बॉलीवूड अभिनय कारकिर्दीत महिमा आणि अभिनेता अजय देवगण यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. यावर काही वर्षानंतर तिने खुलासा केला आहे.

सध्या महिमा चौधरी बॉलीवूडला अलविदा केलं आहे. मात्र ती सोशल मीडियावर सतत अक्टीव असून मुलीसोबत बरेच फोटो शेअर करत असते. बॉलीवूडमध्ये चित्रपटाच्या माध्यमाने महिमा चौधरी अजय देवगण सोबत बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. दरम्यान अजय आणि काजोल यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली एक ‘दिल क्या करे’हा चित्रपट बनला. यावेळी महिमा आणि अजय च्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या. मात्र एका इंटरव्हयू मध्ये महिमाने याबद्दल खुलासा केला. जेव्हा १९९९मध्ये अजयचा काजोलसोबत विवाह झाला. त्या दरम्यान महिमाचा अक्सीडेंट झाला होता, चेहऱ्याला लागल्याने शुटिंग करण्यास असमर्थ असल्याने अजय देवगणने खूप मदत केली. यामुळे सर्वांना असे वाटू लागले की, आमचं अफेअर असेल मात्र त्याचं लग्न झालेलं होत. माझे प्रॉब्लेम दूर करण्यास अजयने खूप मदत केली असे सांगीतले. महिमा आज जरी बॉलीवूडमध्ये दिसत नाही, मात्र सोशल मीडियाच्या माध्यमाने ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

महत्वाच्या बातम्या :