अभिनेत्री ईशा गुप्ताने शेअर केला ‘तो’ वाईट अनुभव

अभिनेत्री ईशा गुप्ताने शेअर केला ‘तो’ वाईट अनुभव

isha

मुंबई : बॉलिवूडमध्ये काम करताना कलाकारांना अनेकदा चांगल्या वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते.असाच एक वाईट अनुभव अभिनेत्री ईशा गुप्ताने शेअर केला आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून सतत तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते. यावरून तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला आहे. ईशाने नुकतीच एका मुलाखत दिली ही माहिती शेअर केली.

दरम्यान एका मोठ्या दिग्दर्शकाने तिला सेटवर शिवीगाळ केली होती. याबद्दल सांगताना ईशा म्हणाली की, ‘एका दिग्दर्शकांसोबत मला खूपच वाईट अनुभव आला आहे. त्याने मला सेटवरच शिवी दिली होती. कारण मला त्या दिग्दर्शकांच्या सहाय्यक दिग्दर्शकासोबत थोडी समस्या होती. जेव्हा कधी मला सेटवर पोहचायला वेळ व्हायचा, अर्थात बऱ्याचदा माझा अलार्म चुकला, कधी मी ट्रॅफिकमध्ये अडकली आणि उशिरा सेटवर पोहचली. मात्र तसे पाहिले तर मला कधीच उशीर होत नसायचा मी वेळ पाळण्यावर विश्वास ठेवते. एकदा सेटवर आऊटफिटवरून काही समस्या निर्माण झाल्या ज्यामुळे सहाय्यक टीम आणि दिग्दर्शक टीमध्ये काहीतरी गोंधळ झाला. जशी मी सेटवर गेली मी सर्वांची माफी मागितली. तेव्हा त्या दिग्दर्शकाने हिंदीमध्ये काहीतरी म्हटले, आणि मी फक्त त्याच्याकडे पाहिले. तो म्हणाला तुला खूप उशीर झाला आहे. तसे पाहिले तर मी खूप शांत आहे. मी सांगितले की, मी उशिरा आलेच नाहीये. उलट मी सर्वांच्या आधी इथे आली कपड्यावरून काहीतरी समस्या होती ती आता नीट झाली. त्यामुळे मी माफी मागितली. त्यानंतर पुन्हा त्याने मला शिवी दिली. बस माझ्यासाठी तेवढे पुरेसे होते.

ईशा म्हणाली, ‘मी त्या दिग्दर्शकाला सांगितले तू इथेच आहे, पुन्हा माझ्याशी बोलू नको. कधीच माझा अनादर करू नको. अशिक्षित मूर्ख म्हणत मी बाहेर पडली आणि माझ्या गाडीत बसून निघून गेली. त्यानंतर मला अनेकांनी फोन केले आणि माफी मागितली तेव्हा मी त्यांना सांगितले की, त्याने माफी मागितले पाहिजे. तेव्हा दोन दिवसांनी त्याने मला फोन केला आणि माझी माफी मागितली. मग मी पुन्हा सेटवर गेले.’ तिचा हा अनुभव तिच्यासाठी खुप त्रासदायक होता.

महत्त्वाच्या बातम्या