अभिनेत्री हीना पांचाळला रेव्ह पार्टी प्रकरणात अखेर जामीन मंजूर

hina panchal

मुंबई : सुशांतसिंग प्रकारणानंतर महाराष्ट्र पोलीस सतत अमली पदार्थ विरोधात कारवाई करताना दिसत आहेत. काहीदिवसांपूर्वीच पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता आणि 22 जणांना ताब्यात घेतले होते. या २२ जणांमध्ये कलाकार आणि नृत्यदिग्दर्शकांचा देखील समावेश होता. ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होत. त्या पार्टीकमधून पोलिसांनी ड्रग्ज आणि काही पैसेही जप्त केले होते. ताब्यात घेतलेल्यांमध्ये  मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री हिना पांचालचाही समावेश होता.

दरम्यान, या गुन्ह्यात पोलिसांच्या हाती लागलेल्या बॉलिवूड अभिनेत्री हिना पांचालसह सर्व २५ संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. हिना पांचाळसह २५ संशयितांची नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात  रवानगी करण्यात आली होती.

आता इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणात अभिनेत्री हीना पांचाळला अखेर जमीन मंजूर करण्यात आला आहे. हीना पांचाळसह आणखी 24 जणांना या प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, अंमली पदार्थ बाळगणारा व्यक्ती आणि ज्याच्या वाढदिवसानिमित्त ही पार्टी आयोजित करण्यात आली होती त्या व्यक्तीचा जमीन फेटाळण्यात आला आहे.

गेल्या काही काळापासून ड्रग्स प्रकरणात अनेक खुलासे झाल्यानंतर आता पोलिस सर्व कलाकारांवर बारीक नजर ठेवून आहेत. आता ड्रग्ज प्रकरणाबाबत पोलिस अधिक कडक आणि सतर्क झाले आहेत. पोलिसांनी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना ड्रग्जसह पार्टी करताना अनेक वेळा अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP