लग्नाच्या वाढदिवशी दीप-वीर तिरूपती बालाजीच्या दर्शनाला

blank

टीम महाराष्ट्र देशा : सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणने १४ नोव्हेंबर, २०१८ रोजी विवाहबंधनात अडकले. दीप- वीरच्या लग्नाचा वाढदिवस कसा साजरा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना दोघांनी तिरूपतीचे दर्शन घेऊन लग्नाचा वाढदिवस साजरा केला.

रणवीर सिंह-दीपिका पादुकोणच्या लग्नाला १४ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झाले आहे. आज पहिली मॅरेज ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी या क्यूट कपलने खूपच खास प्लॅन केला आहे. दिपवीरने तिरूपती बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

रणवीरने २०१० मध्ये ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून बॉलीवूडच्या मायानगरीत पहिले पाऊल टाकले. दोघांनी पहिल्यांदा एकत्र संजय लीला भन्साळीचा चित्रपट ‘गोलियों की रासलीला राम-लीला’मध्ये काम केले होते. या चित्रपटापासूनच या लव्हबर्डची लव्हस्टोरी सुरू झाली.

दरम्यान, दीपिका आणि रणवीरने एकत्र ४ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पहिला चित्रपट २०१३ मध्ये ‘गोलियों की रासलीला राम-लीला’, दुसरा ‘फायनडिंग फॅनी’, तिसरा २०१५ मध्ये ‘बाजीराव-मस्तानी’ आणि चौथा ‘पद्मावत’ चित्रपट दोघांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या