सुजय विखेंनी साकळाई पाणी योजनेचा केवळ निवडणुकीपुरता वापर केला अन् फसवणूक केली

टीम महाराष्ट्र देशा : नगरचे नवनिर्वाचित खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्यावर अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी निशाणा साधला. सुजय विखे यांनी साकळाई पाणी योजनेचा केवळ निवडणुकीपुरता वापर केला आणि जनतेची फसवणूक केली असा आरोप अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी केला. आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदार संघातून डॉ. सुजय विखे पाटील दणदणीत विजय मिळवला. दरम्यान अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेत सुजय विखेंवर निशाणा साधला.

लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान सुजय विखेंनी साकळाई पाणी योजनेच्या मुद्द्यावर मतं मागितली. पण निवडणुकीनंतर त्यांनी हा विषय सोडून दिला, असा आरोप त्यांनी केला. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानसभेच्या अगोदर साकळाई योजनेला सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र मुख्यमंत्री आणि सुजय विखेंना निवडणुकीनंतर याचा विसर पडला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

इतकेच नव्हे तर ९ ऑगस्टपासून साकळाई पाणी योजनेच्या मुद्द्यावरून उपोषणाला बसणार असल्याचेही त्यांनी म्हंटले.