विकीचा शुटींगदरम्यान भीषण अपघात ; चेहऱ्यावर पडले १३ टाके !

टीम महाराष्ट्र देशा : सर्जिकल स्ट्राइकवर बनलेला ‘उरी’ या चित्रपटातून सर्वाना भुरळ घालणारा अभिनेता विकी कौशलचा १८ एप्रिलला शुटींग दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये त्याला १३ टाके पडले असून त्याच्या जबड्यात देखील दुखापत झाली आहे.

विकी कौशल गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक भानू प्रताप सिंग यांच्या हॉरर सिनेमासाठी गुजरातमध्ये शूटिंग करत होता. त्यावेळी अॅक्शन सीनदरम्यान विकी कौशलचा अपघात झाला. जहाजावर शुटींग चालू असताना अचानक विकीच्या अंगावर दरवाजा पडला.त्यात तो गंभीर जखमी झाला.  त्याला तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. आता पुढील उपचारासाठी त्याला मुंबईमध्ये आणण्यात आले आहे. परंतु झालेल्या अपघातात विकी कौशलच्या गालाच्या हाडाला दुखापत झाली असून चेहऱ्यावर १३  टाके पडले आहेत.Loading…
Loading...