ढाई किलो का हाथ, भाजपा के साथ, सनी देओलचा भाजप प्रवेश

sunny deol joins bjp

टीम महाराष्ट्र देशा: ढाई किलो का हाथ किसी पर पड़ता है न तो आदमी उठता नहीं, उठ जाता है. या डायलॉगसाठी कायम सर्वांच्या लक्षात राहणारे अभिनेता सनी देओल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि पियुष गोयल यांच्या उपस्थितीमध्ये सनीने भाजप प्रवेश केला. सनी देओलला पंजाबच्या गुरुदासपूर येथून लोकसभा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

सनी देओल यांची सिनेविश्वात असणारी देशभक्त भूमिकेमुळे भाजपला फायदा होण्याची आशा आहे, काही दिवसांपूर्वीचं सनीने भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती, या भेटीमध्ये त्याचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा होती.

दिवंगत अभिनेते विनोद खन्ना हे गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून १९९९, २००४ आणि २०१४ साली तीनवेळा विजयी झाले होते. त्यामुळे खन्ना यांच्यानंतर सनी देओलला येथून लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी भाजपने केली आहे.

यावेळी बोलताना देशातील तरुणांना मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे., माझे वडील अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी जोडले गेले होते. आता मी नरेंद्र मोदींशी जोडलो गेलो आहे. मी जास्त बोलणार नाही पण काम करून दाखवेन, असा विश्वास सनी देओलने व्यक्त केला आहे.Loading…
Loading...