कोकणवासियांच्या मदतीसाठी अभिनेता सुनील शेट्टीचा पुढाकार

sunil sheety

कोकण : कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. प्रचंड पाऊस झाल्यानं अनेक शहरं आणि गावं पाण्याखाली गेली. कोकणातील अतिवृष्टीचा मोठा फटका रायगड जिल्ह्यालाही बसला. अनेक ठिकाणी दरडी कोसल्याच्या घटना घडल्या. अशा परिस्थितीत तेथील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेकजण मदतीचा हात पुढे करताना दिसत आहे. यातच आता बॉलिवड अभिनेता सुनील शेट्टी देखील कोकणवासियांच्या मदतीला पुढे सरसावला आहे.

सुनील शेट्टीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया’ या सामाजिक संस्थेसोबत मिळून कोकणासाठी मदत करणार असल्याची माहिती त्यांने या माध्यमातून दिली आहे. कोकणात अनेक शहरं पाण्याखाली गेली आहेत. रायगड आणि रत्नागिरीमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. भारताचे नागरिक म्हणून आपण सगळे कोकणवासियांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, अशी भावना सुनील शेट्टीने व्यक्त केली आहे. सुनील शेट्टीने घेतलेल्या या पुढाकाराबद्दल ‘सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया’ संस्थेच्या संचालिका चित्रलेखा पाटील यांनी देखील आभार व्यक्त केले आहे.

काही दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पोस्ट करत या यांनी लिहिले आहे की, ‘इतर राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर बॉलीवूडमधून मदतीसाठी अनेकजण पुढे येतात. माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला साधं ट्विटही करावंसं वाटत नाही, याचं आश्चर्य वाटतं. अनेक स्वयंसेवी संस्थांनी सुरु केलेलं आहे. आमचे महाराष्ट्र सैनिकही झटतायत. अशावेळी माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बड्या बॉलीवूड ताऱ्यांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदतकार्याला हातमदतकार्य भार लावावा असं जाहीर आवाहन करतो,’ यांची ही पोस्ट प्रचंड चर्चेत होती. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या