ट्रंम्प तात्या म्हणतात उसाला भाव ‘पस्तीशेच’ पाहिजे; रितेश देशमुखने ट्विट केला व्हिडीओ

टीम महाराष्ट्र देशा: सध्या सोशल मिडीयावर एक मिम व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह एक लहान मुलगा माईकवर बोलतो. खास मराठी शैलीत ट्रम्प मुलाला विचारतात कि ‘उसाला काय भाव मिळाला पाहिजे’ त्यावर मुलाचे उत्तर येते ‘पस्तीशे’. आणि हाच व्हिडीओ कायम शेतकऱ्यांची बाजू मांडणारा अभिनेता रितेश देशमुख याने ट्विट केला आहे. यावरूनच ट्रम्प तात्या आणि रितेश देशमुख दोघेही उसाला पस्तीशे भाव मिळण्यासाठी बोलत असल्याची चर्चा सोशल मिडीयावर रंगली आहे.

दरवर्षीप्रमाणे उसाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना आक्रमक होत असल्याच पहायला मिळत. यंदा ३५०० रुपये भाव देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात एकच भाव देन शक्य नसल्याने जिल्हावार कारखान्यांनी वेगवेगळे भाव दिले आहेत.