रितेश देशमुखला जेनेलियाकडून हटके बर्थ डे ‘गिफ्ट’

ritesh deshmukh and geneliya

टीम महाराष्ट्र देशा: मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनी आपला 40 वा वाढदिवस १७ तारखेला साजरा केला. त्याच्या वाढदिवसाला पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझाने अतिशय महागडं गिफ्ट रितेश ला दिले आहे. स्वत:हा रितेशने या खास गिफ्टचा फोटो ट्विटरवर शेअर करुन याची माहिती दिली. जेनेलियाने रितेशला नुकतीच भारतात लॉन्च झालेली ‘टेस्ला एक्स’ ही महागडी कार वाढदिवसाला गिफ्ट दिली आहे.

काय आहेत या महागड्या कारचे वैशिष्टे:

या कारची भारतातील किंमत सुमारे 68 लाख रुपयांच्या घरात आहे. टेस्लाची ही गाडी पूर्णपणे वीजेवर चालणारी आहे. पाच दरवाजे आणि अत्याधुनिक सुविधा असलेली ही गाडी 135 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने सुसाट धावते. एक कोटींहून अधिक किंमतीच्या इम्पोर्टेड गाड्यांवर 20 लाखांपर्यंतचा कर आकारला जातो. मात्र टेस्ला ही पूर्णपणे विजेवर चालणारी कार असल्याने आरटीओच्या करांमधून सूट मिळाल्याची माहिती देखील मिळत आहे.

काय ट्वीट केले आहे रितेशने: Loading…
Loading...