कोणी माझ्यावर दबाव टाकू लागल तर मी राजकारणात प्रवेश करेल- प्रकाश राज

टीम महाराष्ट्र देशा: दक्षिण भारतात सिनेक्षेत्र आणि राजकारण याचं नात जरा जास्तच जवळच आहे. तामिळनाडू मध्ये रजनीकांत यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केलीये तर दुसरीकडे नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे अभिनेते प्रकाश राज यांनी सुद्धा राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.

बेंगळुरू येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या उपस्थितीत प्रकाश राज म्हणाले, राजकारणात उतरण्यात मला रस नाही. पण जर मला वारंवार धमकी दिली, जर कोणी माझ्यावर सातत्याने दबाव टाकू लागला, जर कोणी मला वारंवार राजकारणात उतरण्याचे आव्हान देऊ लागले तर मी निश्चित राजकारणात प्रवेश करेल.

दरम्यान, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर प्रकाश राज यांनी आपला राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याची धमकी दिली होती. त्यावेळेस प्रकाश राज चांगलेच चर्चेत आले होते. प्रकाश राज हे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत आणि आता कर्नाटक मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या प्राश्वभूमिवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या मंचावरून केलेल्या हा वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.