अभिनेते परेश रावल यांनी त्यांच्या निधनाची अफवांवर दिले मजेशीर उत्तर…

परेश रावल

मुंबई : सध्या सोशल मिडियावर कोणतीही बातमी काही मिनिटामध्ये सगळीकडे पसरते मात्र यामुळे काही चुकीची माहिती, अफवा देखील न जाणता लोकांपर्यंत पोहचली जाते. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या निधनांच्या अफवा व्हायरल होत आहेत. मुकेश खन्ना, मिनाक्षी शेषाद्री, किरण खेर अशा अनेकांच्या निधनाच्या अफवा पसरवल्या गेल्या आणि ही पाहून त्या सेलिब्रिटींनी आपण ठीक असल्याचे स्वत: सांगितल. आता अशीच एक अफवा पसरली आहे ती म्हणजे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांच्या निधनाची. आज सकाळी परेश रावल यांच्या निधनाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.

या व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, १४ मे २०२१ रोजी सकाळी  ७ वाजता परेश रावल यांचे निधन झाले. त्यानंतर परेश रावल यांनी या अफवेवर मोठी मजेदार प्रतिक्रिया दिली. ‘गैरसमजाबद्दल दिलगीरी व्यक्त करतो, कारण सकाळी ७ वाजता मी झोपलेलो होतो,’ असे मजेदार ट्विट त्यांनी केले. परेश रावल यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या पोस्टचा स्किनशॉर्ट शेअर केला असून, त्यांच्या या ट्विटवर चाहत्यांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच परेश रावल यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. त्याआधी त्यांनी लसीचा पहिलं डोस देखील घेतला होता त्यानंतर काही दिवसातच त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोरआले. मात्र ते यातून बरे झाले असून सध्या त्यांची तब्येत उत्तम आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP