पुणे : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाइल्स या चित्रपटावरून देशभरात राजकारण सुरु आहे. काहींनी चित्रपटात खोटा इतिहास दाखवल्याचं म्हणल आहे. तर काहीजण म्हणत आहे कि हाच इतिहास खरा आहे. काहींचं असंही म्हणणं आहे कि, चित्रपटात अर्धवट इतिहास दाखवला आहे. यावर आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सगळे सलोख्याने राहत असताना असं मध्येच बिबा घालणं योग्य नाही, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
इथले हिंदू आणि मुस्लिम हे इथलेच आहेत, त्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. तसेच द कश्मीर फाईल्स चित्रपटामुळं जे गट पडलेत ते चुकीचे आहेत. असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. तसेच हा चित्रपट अद्याप पाहिला नसल्याने त्यावर अधिक बोलणे योग्य ठरणार नाही. असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: