फसवणुकीप्रकरणी ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील ‘मंत्री’ पत्नीसह गजाआड

पुणे : ‘तुझ्यात जीव रंगला’ या झी मराठी वाहिनीवरील या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिसांनी मंगळवारी मिलिंद दास्ताने आणि सायली दास्ताने यांना अटक केली. त्यानंतर या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दास्ताने आणि त्यांच्या पत्नीला २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिलिंद दस्ताने आणि त्यांच्या पत्नी सायली दस्ताने यांनी काही महिन्यापूर्वी पुण्यातील पु.ना. गाडगीळ ज्वेलर्समधून जवळपास २५ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली होती. मात्र दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी वेळेत पैसे परत न केल्याने त्यांच्याविरोधात गाडगीळ यांनी तक्रार दाखल केली. दस्ताने यांच्याकडे पैसे नसतील तर त्यांनी खरेदी केलेलं सोनं परत करावं, अशी मागणी पु.ना. गाडगीळ ज्वलर्सच्या मालकांनी केली होती. पोलिस दस्ताने यांच्या पुण्यातील घरी देखील पोहोचले होते मात्र, त्याचा घराला कुलूप होतं. आज अखेर पोलिसांनी त्यांना पत्नीसह अटक केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
तृप्ती देसाईंवर अश्लील टीका करणाऱ्यांचा किशोरी शहाणेंनी  घेतला समाचार
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील
आता 'यां'नीही केला CAA आणि NRC ला विरोध, शरद पवारांची घेतली भेट