नवीन वर्षाची दुख:द सुरूवात,ज्येष्ठ अभिनेते कादर खान काळाच्या पडद्याआड

टीम महाराष्ट्र देशा- ज्येष्ठ अभिनेते व लेखक कादर खान यांचे काल ३१ डिसेंबरला दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. कादर खान यांचा मुलगा सरफराज याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

खान हे प्रदीर्घ काळापासून श्वसनाच्या समस्येने त्रस्त होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड झाला होता. अखेर 31 डिसेंबर रोजी कॅनडा येथे सायंकाळी सहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या जाण्याने एक उत्तम अभिनेताच नव्हे तर एक लेखक आणि एक उत्तम माणूस गमावल्याची भावना सिनेवर्तुळातून व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर कॅनडातचं अंत्यसंस्कार होणार आहेत.Loading…
Loading...