‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील ‘तो’ भाग वगळणार?

पुणे : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका शेवटच्या टप्प्यावर असतानाच माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी ही मालिका थांबिण्याची मागणी केली आहे. तसंच स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांवरचे जे चित्रण सध्या प्रसारित केलं जात आहे ते मनाला न पटणारं आहे. एका राजाचं असं चित्रीकरण पाहताना मन हेलावून जात असल्याच खोतकर यांचे म्हणणे आहे.

संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीने छळ करून त्यांना यातना देण्यात आल्या त्या पाहणे आम्हाला शक्य होणार नाही. त्यामुऴे राज्यातील सामाजिक सलोखा बिघडू शकण्याची भीतीही अर्जुन खोतकरांनी व्यक्त केली होती.

Loading...

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील संभाजी महाराजांच्या हत्येचा भाग वगळणार असल्याचं आश्वासन डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलं आहे. अमोल कोल्हेंनी फोनवरून हे आश्वासन दिल्याचं अर्जुन खोतकरांनी न्यूज18 लोकमतला सांगितलं आहे.

दरम्यान, अभिनेते अमोल कोळे यांनी देखील फेसबुकवर पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वराज्यरक्षक संभाजी मालिका २.५ वर्षे सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे.माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल! कृपया चुकीची बातमी दिली जाऊ नये ही विनंती असं त्यांनी म्हटलं आहे .

दरम्यान,कुणाच्या तुष्टीकरणासाठी खोतकर हि मागणी रेटत आहेत का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. जो सत्य इतिहास आहे तो मराठी जनतेपर्यंत पोहोचलाच पाहिजे अशी मागणी आता शिवप्रेमी करत आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात