अभिनेता आमिर खान, करीना कपूर यांच्या आगामी चित्रपट शुटींगला गती ; दोन वर्षांपासून होते पेंडिग

karina

मुंबई : दरवर्षी हिट चित्रपट देणाऱ्या आमिर खानचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्डा ‘च्या शुटींगची चर्चा जोरदार सुरू आहे. या चित्रपट शूटींगबद्दल अंधेरी लिंक रोडवर चर्चा करतांना नुकतेच अभिनेत्री करीना कपूर आणि आमिर खान हे दोघे दिसले.

यावेळी गेल्या दोन वर्षांपासून पेंडिग असलेल्या ‘लाल सिंह चड्डा ‘चित्रपटाच्या शूटींगची चर्चा सुरू होती. या चित्रपटाच्या माध्यमाने अभिनेत्री करीना कपूरने मुलगा जहांगीरच्या जन्मानंतर पहिल्यांदाच सेटवर कमबॅक केले आहे. आमिर, करीना या दोघांना टी-सिरीजच्या कार्यालयाबाहेर स्पॉट करण्यात आले. दरम्यान करीना कपूर पाच महिन्यांची गरोदर असतांनाच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.

आता या चित्रपटाचे शूटींग पूर्ण होत असून अद्वैत चंदन निर्देशित हा चित्रपट क्रिसमस २०२१ मध्ये रिलीज होणार असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य हा बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. दरम्यान जुलै महिन्यामध्ये आमिर खान ने वाखा गाव,लद्दाख मध्ये चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल असून मुंबई़मध्ये शुटिंगसंदर्भात टी-सिरीजच्या ऑफिस बाहेर बाऊंसरसोबत दिसले. आता आमिरच्या चाहत्यांसाठी ही गुडन्यूज असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट बघत आहेत.

महत्वाच्या बातम्या :