बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्याला कार्यकर्त्यांकडून चोप

बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्याला कार्यकर्त्यांकडून चोप

बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्याला कार्यकर्त्यांकडून चोप

औरंगाबाद : २९ जुलै रोजी पंचायत समिती उपसभापती निवडणुकीत भाजपात दाखल झालेले अर्जुन शेळके विजयी झाले होते. काँग्रेसचा एका मताने या निवडणुकीत पराभव झाला होता. पराभव जिव्हारी लागल्याने आज सकाळी उपसभापती शेळके आपल्या दालनात कामकाज करत असताना त्यांना मारहाण करण्यात आली. मारहाणीत त्यांचे कपडे फाटले आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार हरिभाऊ बागडे यांनी पंचायत समितीकडे धाव घेतली. शेळके पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोलिसांत धाव घेतली. पराभव सहन न झाल्याने काँग्रेसच्या काही पंचायत समिती सदस्यांनी शेळकेंना मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.

काँग्रेस आणि भाजपात राडा झाल्याने पंचायत समिती मध्ये धावपळ उडाली. पराभूत झालेले काँग्रेस सदस्य अनुराग शिंदे यांच्यासह ६ ते ७ जणांनी मारहाण केल्याचा आरोप उपसभापती शेळके यांनी केला आहे. दालनात खुर्च्यांची फेकाफेकी करण्यात आली. यामध्ये खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे. ऐनवेळी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शेळकेंनी भाजपात प्रवेश करुन विजय मिळवला. काँग्रेसची मते फुटल्याने शिंदे यांचा पराभव झाला होता. शेळके यांना १० तर शिंदे यांना ९ मते मिळाली होती. या निवडणुकीनंतर राजकारण तापले.

महत्त्वाच्या बातम्या