सहावीच्या भूगोल पुस्तकामध्ये गुजराती धडा; अहमदाबाद मधील त्या मुद्रकावर होणार कारवाई

नागपूर  – मराठीच्या सहावीच्या पुस्तकातील गुजराती पानाचा मुद्दा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा उपस्थित करुन त्या मुद्रकावर कारवाई करण्याची मागणी केली. शुक्रवारी आमदार सुनिल तटकरे यांनी औचित्याच्या मुद्दयाखाली हा प्रश्न उपस्थित करुन सरकारला कोंडीत पकडले होते आणि त्या प्रश्नावरुन सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब करावे लागले होते.

या मुद्दयावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला. त्यावर शालेय शिक्षणमंत्र्यांनी त्या मुद्रकाकडून या पुस्तकाची बांधणी करताना मराठी भूगोलाच्या पुस्तकामध्ये गुजराती पुस्तकाची पृष्ठे लागली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर मुद्रणालयाकडून झालेल्या चुकीबाबत खुलासा मागविण्यात येत आहे. पुस्तकामध्ये सदोष बांधणी करणाऱ्या मुद्रणालयावर कारवाई करण्याची तरतुद निविदेच्या अटी व शर्तीमध्ये आहे. अहमदाबादमधील श्लोक प्रिंट सिटी या मुद्रणालयावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट संकेतही दिले.

दरम्यान सभागृहनेते चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सभागृहामध्ये विरोधकांनी हे पुस्तक छापून आणले असेल असे वक्तव्य केले होते. त्यावेळी आमदार सुनिल तटकरे यांनी मी माझ्या ३०-३५ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असा प्रकार कधी केला नाही आणि तसे वाटत असेल तर सभागृहात विष पिवून आत्महत्या करेन असे भावनिक वक्तव्य केले होते. त्यामुळे सभागृहामध्ये गोंधळ होत सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले होते. त्या वक्तव्यावर आज सभागृहनेते चंद्रकांतदादा पाटील यांनी सभागृहामध्ये दिलगिरी व्यक्त केली.

मराठीच्या पुस्तकात गुजराती भाषेचे धडे; मराठीच्या अस्मितेसाठी राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक…

You might also like
Comments
Loading...