राधाकृष्ण विखेंवर लोकसभेच्या निकालानंतर कारवाई होणार

vikhe patil

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल राधाकृष्ण विखे यांच्यासह ५ आमदारांवर कॉंग्रेस कारवाई करणार आहे परंतु त्यासाठी आता लोकसभा निकालाची वाट बघावी लागणार आहे. या आधी १० तारखेला झालेल्या कॉंग्रेसच्या बैठकीत कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

Loading...

राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर चार आमदारांनी लोकसभेचा निवडणुकांदरम्यान विरोधी उमेदवारांना मदत केली होती. विखे यांनी सुपुत्र सुजय विखे यांना मदत केली होती ते भाजपकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर नितेश राणे यांनी त्यांचे भाऊ निलेश राणे यांचा प्रचार केला. आमदार कालिदास कोळंबकर यांनी उघडपणे शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचार केला. तर जयकुमार गोरे यांनी आघाडीधर्म सोडून भाजपची मदत केली. त्यामुळे कॉंग्रेस या नेत्यांवर कडक कारवाई करणार असल्याच बोललं जात आहे.

दरम्यान, भाजपकडूनही रावसाहेब दानवे आणि शिवाजी कर्डिले यांनी विरोधी उमेदवाराला मदत केली असा आरोप होत आहे परंतु भाजपने अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.Loading…


Loading…

Loading...