उत्तर प्रदेश मध्ये धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावल्यास होणार कारवाई

loudespekar up

अलाहाबाद : उत्तर प्रदेशमध्ये प्रशासनाची परवानगी न घेता लाऊडस्पीकर लावल्यास कारवाई होणार आहे. तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा मंदिर, मशीद आणि गुरुद्वारांचा शोध घेतला जात आहे. परवानगी नसलेले लाऊडस्पीकर आता हटवण्यात येणार आहेत.

उत्तर प्रदेश भाजप सरकार अनेक धडाकेबाज निर्णय घेत असून आता कर्कश व मोठ्या आवाजात वाजणाऱ्या लाऊडस्पीकर आता बंद होणार आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार धार्मिक स्थळांवर परवानगीशिवाय लाऊडस्पीकर लावलेल्या आणि नियम तोडणाऱ्यांचा शोध घेण्यात येणार आहे. तसा आदेश सुद्धा देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशच्या मुख्य गृहसचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे दिले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात आता मंदिर, मशीद आणि गुरुद्वारा या सर्व ठिकाणी परवानगीशिवाय लाऊडस्पीकर वाजवता येणार नाही. असे केल्यास लाऊडस्पीकर जप्त केला जाईल, शिवाय कायदेशीर कारवाईचा सामनाही करावा लागेल. नियम मोडणाऱ्या स्थळांची ओळख पटवण्याची मुदत १० जानेवारीपर्यंत देण्यात आली आहे. या निर्णयाला समाजवादी पार्टी चे आझम खान यांनी विरोध केला आहे.