अजूनही धोखा टळलेला नाही, छुप्या मार्गाने जिल्हयात प्रवेश केल्यास कारवाई करणार : जिल्हाधिकारी

corona

गडचिरोली : आत्तापर्यंत जिल्हयात आलेल्या 48777 प्रवांशांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून त्यापैकी संभावित 576 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गेल्या आठवडाभरात मुंबई पुणे येथून जिल्हयात आलेल्या 13 लोकांच्या कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर, त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांची तपासणी व त्यांचे नमुने घेण्याचे काम प्रशासनाकडून गतीने सुरू आहे. त्यामूळे अजूनही आपला धोखा टळलेला नाही, लोकांनी आवश्यक खबरदारी घेवून, छुप्या मार्गाने जिल्हयात प्रवेश केलेल्या नागरीकांबाबत प्रशासनाला माहिती द्यावी असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आवाहन केले आहे.

सद्यस्थितीत कोरोना कोविड सेंटर(CCC) मध्ये 2092 प्रवाशांना मुंबई, पुणे येथून आल्याने व अति जोखमीचे असल्याने ठेवण्यात आले आहे. संस्थात्मक विलगीकरणात गावस्तरावरती तसेच गावातील सार्वजनिक इमारतीत ठेवलेल्या 17590 प्रवाशांवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. ग्रीन झोन तसेच कमी धोखा असलेल्या ठिकाणांवरून आलेल्या 14031 प्रवाशांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले होते. सद्यस्थितीत यातील 10932 प्रवाशांचा 14 दिवसांचा विलगीकरणातील कालावधी पूर्ण होणे बाकी आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय कोट्यातील ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन भुजबळ उतरले पुन्हा मैदानात

आपल्याच जिल्हयातील प्रवाशी परत येत आहेत घाबरू नका काळजी घ्या

जिल्हयात बाहेरून येणारी संख्या मोठी असली तरी ते आपल्याच जिल्हयातील नागरिक आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याची आता गरज आहे. बाहेरून आलेल्या प्रत्येकाने स्वत:हून इतरांपासून दूर राहणे गरजेचे आहे. स्थानिक लोकांनी त्यांचा तिरस्कार न करता त्यांना आरोग्यविषयक प्रक्रियेत आणले पाहिजे. यामध्ये प्रशासनाकडे नोंद करणे, लक्षणे असल्यास आरोग्य सेवकांकडे नोंदविणे, त्यांना घरीच राहण्यास सांगणे, ऐकत नसल्यास प्रशासनाकडे तक्रार नोंदविणे इत्यादी.

प्रत्येक दुकानदारांनी ग्राहकांची नोंद ठेवावी 

जिल्हयात कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्यामूळे आता प्रत्येक स्तरावर आवश्यक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाकडून प्रत्येक दुकान व कार्यालयात येणाऱ्या व्यक्तींच्या तसेच सर्व ग्राहकांच्या नोंदी ठेवण्यासाठी आवाहन केले आहे. यासाठी एक रजिस्टर ठेवून त्यामध्ये नोंदी ठेवाव्यात. यासाठी ग्राहकांना लिहण्यास न सांगता दुकान मालकांनी स्वत: नोंदी घ्याव्यात किंवा त्यासाठी मदतनीसाची व्यवस्था करावी.

कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने खाजगी नोंदवही ठेवण्याची आवश्यकता : कोरोना हा संसर्ग बाधिताच्या संपर्कात आल्याने होतो. सद्या टाळेबंदी असल्याने कमीत कमी इतर लोकांशी संपर्क ठेवणे आवश्यक आहे. यातूनही नकळत कोणा बाधित व्यक्तीशी संपर्क आला तर त्यामध्ये पुढिल संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने ‘पर्सनल डायरी’ म्हणजेच खाजगी नोंदीवही ठेवणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आवाहन केले आहे. जिल्हयात कोरोना बाधित आढळून आल्याने आता प्रशासन बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेत आहे. यातूनच ही संकल्पना आवश्यक असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. कारण बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीचे नाव दिले तर पून्हा त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध तात्काळ घेवून ही संसर्ग साखळी वेळेत रोखता येईल. यासाठी प्रत्येकाने आपण कोणाकोणाला कुठे कुठे भेटलो याच्या नोंदी ठेवणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे.

अत्यावश्यक सेवा वगळून रविवारी सर्वांनी बंद पाळावा : जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक रविवारी सर्व ठिकाणी दुकाने, वाहतूक बंद ठेवून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. यातून फक्त आरोग्यविषयक सेवा व सुविधा, शेतीविषयक खते, बि-बियाणांची दुकाने, पेट्रोलपंप यांना सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा सोडून कोणतीही इतर आस्थापना, सेवा व दुकाने तसेच वाहतूक उद्या तसेच प्रत्येक रविवारी नागरिकांना सुरू ठेवता येणार नाही.

औरंगाबाद : भाजप खासदाराच्या पुत्रांची गुंडागर्दी, पक्षाच्याच कार्यकर्त्याला केली मारहाण