वीजबिल वसुलीसाठी ग्राहकाला विनाकारण त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार : डॉ. नितीन राऊत

नितीन राऊत

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात कारखाने आणि घरगुती ग्राहकांना महावितरणने भरमसाठ बिले दिली आहेत. कोरोनाच्या महामारीतून अद्याप कारखाने आणि सर्वसामान्य माणूस बाहेर आला नाही. ही वाढीव बिले कमी करून आकारण्यात यावीत अशी मागणी सर्वसामान्य जनता करत आहे.

लॉकडाऊनमध्ये चार-पाच महिन्यांची एकत्रित विजबिले दिली आहेत. त्यामुळे वाढीव वीज बिल आले आहे अशा ज्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत, त्याच्या वीज वापराची खातरजमा करून बिल दुरुस्त करून देण्याचे निर्देश महावितरणला दिले आहेत. तसेच बिलाची जादा रक्कम असेल तर तीन सामना हप्त्यात भरण्याची सोय करून देण्याचे निर्देश दिलेले आहेत.

वाढीव वीज बिल आधी भरा, मग दुरुस्ती करू असे कोणी महावितरणचा अधिकारी म्हणत असेल, ग्राहकाला विनाकारण त्रास देत असेल तर ग्राहकांनी त्याची तक्रार महावितरणच्या संकेतस्थळावर किंवा ऊर्जा विभागाकडे करावी. त्याची खातरजमा करून संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या :