fbpx

संजय शिंदे यांच्यावर कारवाई होणार – चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत संजय शिंदे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे असे स्पष्ट केले आहे. संजय शिंदे यांच्या संबंधित तीन साखर कारखान्यांची चौकशी व्हावी असे चंद्रकांत पाटील यांचे मत आहे. शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या साखर कारखान्याने पैसे उचलले आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी होईल, असं पाटील म्हणाले.

माढा लोकसभा मतदार संघातून आघाडीकडून संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र इथून मागे संजय शिंदे हे भाजपच्या पाठींब्यावर सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष होते. याच पार्श्वभूमीचा वापर करत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी संजय शिंदेंनी भाजपशी गद्दारी केली असून त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, असं वक्तव्य केल होत. यावर संजय शिंदे यांनीही पाटलांना प्रतिउत्तर दिले होते. ‘मी कधी भाजपमध्ये प्रवेशच केला नव्हता. त्यामुळे गद्दारीचा प्रश्नच येत नाही आणि आपण कोणाच्या धमकीला घाबरत नाही.’ अशा शाबडत संजय शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना जोरदार उत्तर दिले.

दरम्यान, अजित पवार सिंचन घोटाळा प्रकरणाच्या केसचा निकाल कोणत्याही क्षणी येऊ शकतो, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. अजित पवार यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाला आवश्यक ती कागदपत्रे आम्ही तत्परतेने पुरवत असून, कोणत्याही क्षणी त्याचा निकाल येण्याची शक्यता आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले

1 Comment

Click here to post a comment