मुंबई : महाराष्ट्रातील नवीन शिंदे सरकारने फ्लोर टेस्ट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विधानसभेत एकनाथ शिंदे सरकारच्या बाजूने १६४ मते पडली. तर महाविकास आघाडीला ९९ मते मिळाली. यावेळी उद्धव गटाचे शिवसेनेच्या वतीने प्रतोद सुनील प्रभू यांनीही व्हीप जारी करत विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचा आदेश जारी केला होता. मात्र उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची मान्यता विधिमंडळ सचिवालयाने रद्द केली आहे. व्हीप जारी करण्याचा अधिकार शिंदे गटाच्या आमदारांना असल्याने उद्धव गटाच्या उर्वरित १५ आमदारांवरही व्हीप विरोधात गेल्यास कारवाईचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे यांच्यावरील निलंबनाचा धोकाही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियमानुसार कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहे.
आज विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे गटातील १५ आमदारांवर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला. यावर शिंदे यांनी नियमानुसार कारवाई होणार असल्याचे सांगितले.
शिवसेना आता सर्वोच्च न्यायालयात जाणार-
काल विधीमंडळ सचिवालयाने पत्र पाठवून शिंदे गटाचे भरत गोगावले हे शिवसेनेचे प्रमुख व्हिप असल्याचे स्पष्ट केले. उद्धव गटाचे सुनील प्रभू यांना प्रतोद म्हणून मान्यता मिळालेली नाही. अशा स्थितीत त्यांना व्हीप बजावण्याचा अधिकार नाही. एकनाथ शिंदे यांना पक्षनेतेपदावरून हटवण्याचा उद्धव ठाकरे गटाचा निर्णयही विधिमंडळाने रद्द केला आहे. शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांच्या नियुक्तीलाही मान्यता मिळालेली नाही.
शिंदे गट-भाजप सरकार बहुमत चाचणीत पास-
शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर भाजपच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या नव्या महाराष्ट्र सरकारने आज अग्निपरीक्षा दिली. राज्य विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. यापूर्वी रविवारी संध्याकाळी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेना आमदारांच्या गटाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार आणि पक्षाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईतील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. शिवसेनेच्या आणखी एका आमदाराने शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाची ताकद वाढली.
दरम्यान आज झालेल्या बहुमत चाचणीत शिंदे गट आणि भाजप सरकारने बहुमत चाचणी पास केली. १६४ पेक्षा जास्त मते शिंदे गट आणि भाजपला मिळाली. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा झटका मानला जात आहे. महाविकास आघाडीला ९९ मते मिळाली.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<