भाजपला मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई ,आमदार संग्राम जगताप यांना अभय ?

अहमदनगर :‘राष्ट्रवादीकडून भाजपला पाठिंबा देण्याचे आदेश नव्हते. ज्या नगरसेवकांनी भाजपला मदत केली, त्यांच्यावर येत्या पाच दिवसात कारवाई करू, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र ज्या आमदारांच्या सांगण्यावरून या नगरसेवकांनी भाजपला मतदान केले त्या आमदार संग्राम जगताप यांच्यावर राष्ट्रवादी काही कारवाई करणार कि नाही हे गुलदस्त्यातच आहे. आमदार संग्राम जगताप यांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत राष्ट्रवादी दाखवणार का ? असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे.

अहमदनगर महापालिकेच्या महापौर निवडणीमध्ये भाजपच्या खेळीमुळे सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला सत्तेपासून दूर राहावं लागणार आहे. महापौरपदाच्या निवडीत राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीची भाजपसोबत छुपी युती असल्याचा संदेश गेला होता.देशभरात भाजप विरोधी वातावरणात होत असताना नगरमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपला पाठिंबा देण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Loading...

दरम्यान, महापौर निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देऊ नका, असा निरोप मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने दिलेला नव्हता. या निर्णयाशी कोणत्याही नेत्याचा संबंध नसून, मी व पक्षाच्या नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला, असे सांगत संग्राम जगताप यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे.’पक्षाचा आदेश मानला गेला नसेल तर ते अयोग्यच. त्यामुळे पक्षादेश डावलणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,’ असं म्हणत शरद पवारांनी नगरमधील आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना इशारा दिला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात