राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर कारवाई करावी : अंकुश काकडे

radha krushn vikhe patil leader of opposition

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा प्रचार करायचा सोडून विधान सभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांचा प्रचार करत आहेत अशी तक्रार राष्ट्रवादीचे निरीक्षक तथा समन्वयक अंकुश काकडे यांनी पक्ष श्रेष्ठींकडे केली असून यावर त्वरित कारवाई करावी अशी देखील मागणी केली आहे.

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना त्या संदर्भात काकडे यांनी नुकतेच विनंतीपत्र पाठविले आहे. नगर लोकसभा मतदारसंघात विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय भाजपतर्फे निवडणूक लढवित असून ते निवडून येतील, असा उघड प्रचार विरोधी पक्षनेते विखे पाटील करत असल्याचा आरोप काकडे यांनी केला आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच सुजय विखे यांनी भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला आणि उमेदवारी पटकावली. परंतु वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी अद्याप कॉंग्रेस पक्ष सोडलेला नाही त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांची या लोकसभा निवडणुकी मध्ये नेमकी काय भुमका असणार यावर सगळेच लक्ष ठेवून आहेत. एका बाजूला मुलगा सुजय विखे पाटील हे भाजपच नेतृत्व करत आहेत तर दुसरीकडे सहकारी पक्षाचा उमेदवार म्हणून संग्राम जगताप रिंगणात उतरले आहेत.

त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे नक्की पक्षाच्या भूमेकेला न्याय देणार की पुत्र सुजय विखे पाटील यांना मदत करणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहे. असं सारं संभ्रम करणारं वातावरण असतानाच आता काकडे यांनी राधाकृष्ण विखे पाटील हे पुत्र सुजय विखे पाटील यांना मदत करत असल्याचा आरोप करत पक्ष श्रेष्ठींना याकडे लक्ष घालण्यास सांगत आहेत.