‘सनातन’वरून लक्ष हटवण्यासाठीच नक्षलसमर्थकांवर कारवाई – प्रकाश आंबेडकर

prakash-ambedkar

टीम महाराष्ट्र देशा : एल्गार परिषदेनंतर भीमा-कोरेगांव इथे भयंकर दंगल पेटली होती. या दंगलीप्रकरणी आणि त्याआधी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेशी निगडीत असल्याच्या आरोपाखाली मंगळवारी वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोलिसांनी नक्षलसमर्थकांच्या घरावर छापे मारले होते. मात्र ही कारवाई केवळ लोकांचे  लक्ष विचलित करण्यासाठी केली असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि सचिन अंदुरे आणि अन्य काही जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्यांचा सनातनशी संबंध असल्याचं सांगितलं जातं. सनातनच्या लोकांविरूद्ध सुरू झालेल्या कारवाईवरून लक्ष विचलित करण्यासाठीच मंगळवारी देशभरात छापासत्र आयोजित करण्यात आलं होतं असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.