बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्यांवर शिरूरमध्ये कारवाई

shirur

शिरूर/ प्रतिनिधी: शिरुर तहसील कार्यालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या गौण खनिजाच्या वाहतुकीस अळा घालण्यासाठी तहसील कार्यालयाकडून धडक मोहीम राबवली जात आहे. यामध्ये तलाठी व मंडळ अधिकारी यांची पथके तयार करण्यात आली आहेत. काल या पथकाने अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या 6 वाहनांवर कारवाई केली.

या कारवाईत मंडळ अधिकारी श्री. गोसावी, , श्री. घोडके, श्री. देशमुख, श्री. बराटे, तलाठी श्री. नरवडे हे सहभागी होते. सदर वाहनांचे पंचनामे करण्याचे काम चालू असून त्यानंतर त्यांच्या मालकांना दंडाची आदेश बजावण्यात येणार असल्याची माहिती शिरूरचे तहसीलदार रणजीत देसाई यांनी दिली आहे. प्रशासनाने नेमून दिलेल्या मुदतीत दंडाची रक्कम न भरल्यास सदर वाहन मालकांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात येणार आहे.