मराठा क्रांती मोर्चा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

औरंगाबाद: १९ फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्या गेली. मात्र शिवसेनेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करत असल्यामुळे मराठा क्रांती सेना व शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले. शिवजयंती साजरी करण्याच्या तारखेवरून या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचे समजते.

औरंगाबाद शिवसेनेच्या वतीने आज तिथीनुसार शिवजयंतीचा कार्यक्रम आखला होता. तसेच खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्थे आज कार्यक्रमाच उद्घाटन होणार होत. मात्र शिवसेना तिथीनुसार शिवजयंती का साजरी करते? असा आक्षेप मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घेतला. त्यामुळे शिवसेना व मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.