fbpx

शत्रुघ्न सिन्हाच्या बंगल्यावर ‘मनपा’ची कारवाई

शत्रुघ्न सिन्हा

मुंबई : मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत असतांना महापालिकेने अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या जुहू येथील आठ मजली बंगल्यावर कारवाई केली आहे. बंगल्यातील बेकायदा बांधकाम पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तोडले.

यावेळी सिन्हा देखील घरातच होते. सिन्हा यांच्या जुहू येथील ‘रामायण’ बंगल्यात काही प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.

Action by Municipal Corporation on Shatrughan Sinha‘बंगल्याच्या छतावर स्वच्छतागृह, कार्यालय आणि देवघराचे बेकायदा बांधकाम करण्यात आले होते. त्यातील देवघर वगळता इतर बांधकाम तोडण्यात आले.