१० किमीला एका कंत्राटदाराची नियुक्ती केल्यामुळे रस्ते दुरुस्त झाले – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

रत्नागिरी : खड्डेमुक्त रस्त्यांसाठी दर १० किलोमीटरला एका कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याने रस्ते दुरुस्त झाले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.महसूल विभागाच्या आढावा बैठकीनिमित्त ते रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी प्रदीप पी., अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब बेलदार, निवासी जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, रस्त्यांवरील खड्डे ही मोठीच समस्या असून ती दूर करण्यासाठी टेंडरची पद्धत बदलण्यात आली. दर 10 किमी अंतर याप्रमाणे खड्डे भरण्याचे टेंडर काढले. त्यामुळे ठेकेदारावर लक्ष ठेवणे शक्य झाले. त्याच्याकडून चांगले काम करून घेऊन पुढच्या तीन वर्षांची हमी घेण्यात आली आहे. खड्डे पडले तर पुन्हा त्या ठेकेदाराकडून भरून घेण्यात येतील आणि नवीन खड्डे पडल्यास सर्वेक्षण करून निविदा काढून ते भरले जातील. राज्यातील 57 हजार किमीचे रस्ते खड्डेमुक्त करण्यात यश आले आहे. भविष्यात रस्ते आणखी सुस्थितीत ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांच्या डोळ्याला व वाहन चालविण्यास त्रास होणार नाही. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. तीन वर्षांमध्ये 5 हजार किमीचे रस्ते चौपदरी करून राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जाणार आहेत. त्यासाठी 30 हजार कोटी निधीची तरतूद केली आहे.

Loading...

यापूर्वी अर्थसंकल्पात महामार्ग किंवा रस्त्यांसाठी पुरेशा पैशाची तरतूद करण्यात आली नव्हती. त्यामुळे जे रस्ते केले जात होते, त्याला अपेक्षित दर्जा नव्हता, पावसात ते खराब होत असत. कमी रुंदीचे आणि वाहनांच्या क्षमतेचा विचार न करता रस्ते केले जात होते. त्यामुळे रस्ते खराब होत होते. म्हणून राज्यातील 36 जिल्ह्यांतील रस्त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरे केले. आतापर्यंत 32 जिल्ह्याचे दौरे पूर्ण झाले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी चार जिल्ह्यांचा दौरा राहिला होता. आज तो दौरा पूर्ण झाला असून हे जिल्हे खड्डेमुक्त झाले आहेत. रस्त्यांना वेगळा लेअर देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. नियोजित वेळेत महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल, असेही पाटील यांनी सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले