सलमान खान सोबत काम करतांना जॅकी उर्फ जग्गुदादाला असा आला अनुभव..

सलमान खान सोबत काम करतांना जॅकी उर्फ जग्गुदादाला असा आला अनुभव..

jacky

मुंबई : बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता जॅकी श्रॉफ उर्फ जग्गूदादा. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या अभिनयाची छाप आजही चाहत्यांमध्ये तितकीच आहे. मात्र त्यांनी बॉलीवूडचा दबंग सलमान खान सोबत काम करतांना ‘राधे’ चित्रपटात आलेल्या अनुभवाबद्दल नुकतच सांगीतले आहे.

अभिनेता जॅकी श्रॉफ यांचे अभिनय क्षेत्रातील योगदान खूप मोठं आहे. त्यांनी आजवर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र त्यांना वेगळी भूमिका करायची होती, आणि ती संधी अभिनेता सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटाच्या माध्यमाने मिळाली. चित्रपटात त्यांना अशी एक भूमिका मिळाली की, ज्या माध्यमाने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारं होत. सलमान सोबत खूप चांगली बाँडींग असून त्याच्यासोबत काम  करतांना खूप मजा आली असं ही व्यक्त केले.

या चित्रपटाच्या माध्यमाने अभिनेता सलमान आणि जॅकी श्रॉफ एकत्र दिसले. तसे सलमान खानला इंडस्ट्रीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मी ओळखतो, त्याच्या सोबत काम करण्याचा ही मला आनंद वाटतो’ असे जॅकीने सांगीतले. त्या दोघांचा ‘राधे’ चित्रपटाचा प्रीमियर येत्या २६ सप्टेंबर रोजी अन्ड पिक्चर्सवर होणार आहे.

महत्वाच्या बातम्या