जगानुसार स्वत:मध्ये बदल घडविणे आवश्यक – अच्युत गोडबोले

अहमदनगर : तंत्रज्ञानामुळे जग झपाट्यााने बदलत आहे. या बदलत्या जगात स्वतःचे आस्तित्व टिकविण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडविणे आवश्यक आहे. १९६० नंतर आधुनिक युगाला सुरूवात झाली. परंतु मागील १० वर्षात सर्वच क्षेत्रात जे बदल घडून आले तेवढे बदल पुर्वी कधीच झाले नाही, असे प्रतिपादन साॅफ्टएक्सेल कन्सलटंसी सर्विसेस, मुंबईचे कार्यकारी संचालक, विविध विषयावरील पुस्तकांचे लेखक, आयआयटी, मुंबई मधुन उत्तिर्ण झालेले केमिकल इंजिनिअर,साॅफ्टवेअरच्या क्षेत्रात भारत,इंग्लड, अमेरिकेत जगमान्य आंतरराष्ट्र्रीय कंपन्यांमधील सुमारे ३२ वर्षांचा अनुभव असलेले अच्युत गोडबोले यांनी केले.

गोडबोले हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजीत, संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एम.बी.ए.विभागाने आयोजित केलेल्या इमर्जिंग इनोव्हेशन अॅण्ड स्ट्रटेजिक बिझिनेस प्रॅक्टीसेस या विशयावरील दोन दिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी व त्यानंतर अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजीत केल्या जाणारया संजीवनी थाॅट लिडर्स या व्याख्यानमालेत प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. गोडबोले पुढे म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडत आहे. भविष्यातील बदल भाकित करताना ते म्हणाले की, भविष्यात व्यवहारातुन चलन गायब होवु शकते. १८ वर्षांपुर्वी एक माणुस पॅरिसमध्ये मोबाईलवर बोलताना पाहिला. त्यावेळेला एका उपकरणासोबत ही व्यक्ती काय बोलते आहे याची उत्सुकता होती.

आता मोबाईल सर्वांकडेच आहे. पुर्वी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अधिका-यांना मिटींगसाठी मोठा प्रवास करून एका ठिकाणी यावे लागत असे आता जगाच्या कोणत्याही कोप-यात एखाद्या व्यक्तीला ५ मिनीटे अगोदर सांगुन व्हिडीओ कान्फसरंसिंगद्वारे मिटींग घेता येते असे सांगितले. भविष्यात पुस्तक गायब होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली कारण डीजिटल लायब्ररीची संकल्पना पुढे येत असुन इंटरनेटच्या माध्यमातुन कोणतेही पुस्तक वाचक वाचु शकतात. वर्तमान पत्रातील जो विषय वाचकाला वाचायचा आहे. तेवढेच डाऊनलोड करून त्या विषयाचे फक्त शुल्क आकरले जावू शकते. प्रत्येकाने भविष्यातील बदल स्वीकारायला शिकले पाहीजे.उद्याचे जग कल्पनेपलीकडचे असणार आहे. नॅनोरोबो शरीरात कार्य करतील अशी शक्यता त्यांनी वर्तविली. नॅनोरोबो मार्फत आवश्यकता वाटल्यास आपोआप अॅम्बुलन्स दारात उभी असेल. पुर्वी विद्यार्थी चुकले तर शिक्षक करीत असे, सध्या ही पध्दती बंद आहे. परंतु भविष्यात विद्यार्थी चुकले तर ऑटोमॅटीक सौम्य शॉकची यंत्रणा विकसीत होवु शकते असे त्यांनी विनोदाने सांगितले.