यंदाचा आचार्य अत्रे व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार राजेंद्र सरग यांना प्रदान

पुणे – आचार्य अत्रे व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार राजेंद्र सरग यांना ज्‍येष्‍ठ शिक्षणतज्ञ व माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले, माजी न्‍यायमूर्ती प्रमोद कोदे यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आला. आचार्य अत्रे स्‍मृति प्रतिष्‍ठानच्‍यावतीने व्‍यंगचित्रकारितेच्‍या क्षेत्रात उत्‍कृष्‍ट कार्य करणा-या व्‍यंगचित्रकारास हा पुरस्‍कार देण्‍यात येतो. शाल, श्रीफळ, पुष्‍पगुच्‍छ,स्‍मृतिचिन्‍ह आणि रोख रक्‍कम असे पुरस्‍काराचे स्‍वरुप आहे. यावेळी ज्‍येष्‍ठ नाट्यकर्मी अशोक समेळ, प्रतिष्‍ठानचे संस्‍थापक अध्‍यक्ष अॅड. बाबूराव कानडे, डॉ. शाल्‍मली कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

राजेंद्र सरग सध्‍या पुण्‍याचे जिल्‍हा माहिती अधिकारी म्‍हणून सेवेत आहेत. त्यांना यापूर्वी महाराष्‍ट्र शासनाचा सन 2003 चा राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, महाराष्‍ट्र पोलीस दलाच्‍या दक्षता मासिकातर्फे आयोजित राज्‍यस्‍तरीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत सन 2004, सन 2005, सन 2006, सन 2007 मध्‍ये सलग 4 वर्षे प्रथम पुरस्‍कार, सन 2008 मध्‍ये द्वितीय पुरस्‍कार, पवनेचा प्रवाह प्रकाशन संस्‍थेचा सन 2007 चा उत्‍कृष्‍ट साहित्‍य पुरस्‍कार, रोटरी क्‍लब, बीड तर्फे सन 2003 चा व्‍यवसाय गौरव पुरस्‍कार, ओम ह्युमन रिसोर्स डेव्‍हलपमेंट अकादमी, पुणे आणि महात्‍मा गांधी मिशन,औरंगाबाद यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सन 2008-2009 चा राज्‍यस्‍तरीय चौथा स्‍तंभ व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार.

परभणी येथील जनसहयोग सेवाभावी संस्‍थेचा साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन 2012 चा जननायक पुरस्‍कार, सन 2015-16 या आर्थिक वर्षातील उत्‍कृष्‍ट कामगिरीबद्दल आकाशवाणी मुंबईच्‍या वतीने स्मृतिचिन्‍ह व प्रमाणपत्र देऊन गौरव, पुण्‍याच्‍या विश्‍व संवाद केंद्र, पश्चिम महाराष्‍ट्र, आणि डेक्‍कन एज्‍युकेशन सोसायटी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सन 2017 चा देवर्षी नारद व्‍यंगचित्रकारिता गौरव पुरस्‍कार, ‘दिवा प्रतिष्‍ठान’ या दिवाळी अंक संपादकांच्‍या संघटनेच्‍यावतीने सर्वोत्‍कृष्‍ट व्‍यंगचित्रकाराचा सन 2017 चा पुरस्‍कार, पुण्‍याच्‍या काव्‍यमित्र संस्‍थेच्‍यावतीने सन 2018 चा राष्‍ट्रीय कार्यगौरव पुरस्‍कार, सन 2017 चा लोकशाहीर आण्‍णाभाऊ साठे आदर्श पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत. सन 2017 मध्‍ये 100 हून अधिक नामांकित दिवाळी अंकांमध्‍ये त्‍यांनी रेखाटलेली व्‍यंगचित्रे प्रकाशित झाली आहेत. शासकीय कार्यालये तसेच विविध सामाजिक संस्‍थाच्‍या वतीने आयोजित जलसाक्षरता, स्‍वच्‍छता अभियान, प्रदूषण नियंत्रण, बेटी बचाव यासारख्‍या प्रबोधनपर व्‍यंगचित्र प्रदर्शनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे.

पद्मविभूषण जयंत नारळीकरLoading…
Loading...