‘मुलगी झाली हो’ मालिकेतील कलाकाराला लुटणारा आरोपी २ दिवसात अटकेत

मुंबई: ‘मुलगी झाली हो’ ही मालिका अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस पडली. या मालिकेत सध्या दाखवण्यात येत असलेले बाप लेकीचे नाते लोकांच्या आवडीचे ठरत आहे. मात्र या मालिकेतील शौनकची भूमिका साकरणारा कलाकार योगेश सोहोनी याला मुंबई पुणे एक्स्प्रेसवर लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी केवळ २ दिवसात पकडले आहे.

योगेश शनिवारी आपल्या कारने मुंबईहून पुण्याच्या दिशेनं निघाला होता. यावेळी एका भामट्याने योगेश यांना अपघाताच्या नावाने दमदाटी करत त्यांच्या एटीएममधून पन्नास हजार रुपये काढत ते पैसे घेऊन पसार झाला. या आरोपीचा तपास करण्यात पोलिसांना दोनच दिवसात यश आले आहे. योगेश सोहोनीने त्याच्या इन्स्टाग्राम अकांउटवर व्हिडीओ पोस्ट करत या अपघाताची माहिती दिली. तसेच योगेशने पोलिसांचे आणि आरोपी पकडण्यात मदत करणाऱ्या सर्व व्यक्तिचे आभार मानले. योगेशने पिंपरी-चिंचवड भागातील पोलिस कमिशनर कृष्ण प्रकाश यांची प्रत्यक्ष भेट घेत आभार मानले.

तसेच या व्हिडीओत योगेशने मुंबई-पुणे प्रवास करताना सावध राहण्याचे अवाहन नागरिकांना केले. आरोपींना अटक केल्यानंतर पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरु असल्याचे योगेश सोहोणी यांनी सांगिंतले. अल्पावधीतच पोलिसांनी घटनेचा छडा लावल्याने सर्वस्तरातुन त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP