संसदेवर हल्ल्याची धमकी देणारा आरोपी भाजप नेत्याबरोबर

भाजप

टीम महाराष्ट्र देशा- पद्मावत चित्रपट प्रदर्शित झाल्यास संसदेला बॉम्बने उडवण्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची हत्या करू अशी धमकी देणारा क्षत्रिय नेता भुवनेश्वर सिंह भाजप नेत्याबरोबर फिरत असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे भुवनेश्वरवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. पण बरेलीचे भाजपचे महासचिव आदेश प्रताप सिंह यांनी फेसबुकवर काही फोटो पोस्ट केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे .

Loading...

भुवनेश्वर सिंह उत्तर प्रदेश अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचा अध्यक्ष असून पद्मावत प्रदर्शित झाल्यास अभिनेत्री दीपिका पदुकोणला जिवंत पेटवणाऱ्यास १ कोटीचे बक्षिस देण्याची घोषणा भुवनेश्वरने केली होती. या धमकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बरेली पोलिसांनी भुवनेश्वरवर गुन्हा दाखल केला होता. तसेच त्याच्यावर विविध कलमांतर्गत देशद्रोहाचा खटलाही दाखल करण्यात आला होता.Loading…


Loading…

Loading...