झायरा वसिमची छेड काढणा-या आरोपी कारागृहाबाहेर

झायरा वसिम

ठाणे : दंगल सिनेमा फेम अभिनेत्री झायरा वसिमची छेड काढणा-या आरोपीची आज जामिनावर सुटका करण्यात आली आहे. विकास सचदेव असे या आरोपीचे आहे. १२ दिवसानंतर सचदेवची तळोजा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.

झायरा विस्तारा एयरलाईन्सच्या एका विमानाने दिल्ली-मुंबई असा प्रवास करत असताना तिचा सहप्रवासी विकास सचदेव याने तिची छेड काढली होती.

या प्रकरणी झायराने मुंबईतील सहार पोलिसात प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला होता. झायराने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सचदेवला अंधेरीतून अटक केली होती.